सातारा, दि. – सातारा नगरपालिकेचे सन 2021-2022 सुधारित व सन 2022-23 चे अंदाजपत्रक नामंजूर करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
निवेदनात, सातारा पालिकेने नुकतेच सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. सन 2022-23 मध्ये असाधारण खर्च रक्कम तीनेश सव्वीस कोटी एकावन्न लाख तीस हजार सातशे त्रेहत्तर व अखेरची शिल्लक रक्कम 2 लाख 90 हजार 76 रुपये राहील असे गृहीत धरले आहे. पालिकेचे प्रशासनाने मंजूर केलेले अंदाजपत्रक हे फसवेगिरीचे असून आकडयांचा खेळ आहे. अंदाजपत्रक हे केवळ अनुदानावर अवलंबून असून पालिकेने स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत असतानासुध्दा राजकीय दबावापोटी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनासाठी राखीव निधीतून रक्कम काढावी लागत आहे आणि काढलेली सुध्दा आहे. जिल्हाधिका-यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पास सशर्त मंजुरी दिली होती. त्यामधील बहुतेक अटींचे सातारा नगरपालिकेने पालन केलेले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची बिलापोटी कोटयावधींची थकबाकी असताना त्याचा उल्लेख अंदाजपत्रकात केलेला नाही, म्हणूनच हे अंदाजपत्रक दिशाभूल करणारे असल्याचे सदरचे अंदाजपत्रक शिल्लकी अंदाजपत्रक नाही. त्यामुळे नगरपालिका अधिनियमन 1965 च्या तरतुदीचे व अकाऊंट कोडचे उल्लेख करणारे असल्याचे हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येऊ नये अशी मागणी श्री. मोरे यांनी केली आहे.
सातारा नगरपालिकेचे बजेट नामंजूर करा – सुशांत मोरे यांची मागणी

