सातारा - सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी जनता सहकारी बँक लि., सातारा यांच्यामार्फत ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा देण्याच्या दृष्टीने नवीन ए. टी. एम मशिनसह सुसज्ज अशा ए.टी.एम. सेंटरचे उद्घाटन बँकेच्या जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगांवकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी बँक पुन्हा एकदा नफ्यात आली असून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात विनोद कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. माजगांवकर यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेवून स्पर्धात्मक युगात ग्राहकांना मोबाईल बँकींग, IMPS, QRCode, या सुविधांसह इतर आधुनिक सेवा देणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे यापुर्वीचे ए. टी. एम. ऐवजी सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन ए. टी. एम. मशिन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. बँकेचे भागधारक पॅनलप्रमुख, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी मागील ७ वर्षात बँकेच्या दैनंदिन कामकाजात वैयक्तिक लक्ष देवून बँकेकडून रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचे आदेशांचे पालन काटेकोरपणे केले. बँकेच्या सभासद व ठेवीदारांच्या हितास कोणतीही बाधा येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेतली आहे, त्यामुळेच सहकार क्षेत्रातील नामांकित सहकारी बँकांवर RBI कडून विविध कारणांसाठी दंडात्मक कारवाई झाली असून जनता सहकारी बँकेवर मात्र आज अखेरपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही. श्री. कुलकर्णी यांनी दिवस रात्र एक करून दोन वेळा तोटयात गेलेली बँक पुन्हा फक्त नफ्यात आणली तसेच  बँकेची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत भक्कम केलेली आहे.  आज अखेर बँकेचा CRAR रिझर्व्ह बँकेच्या निकषांप्रमाणे ९ % एवढा आवश्यक असताना बँकेने तो २०.६२% एवढा जवळपास दुप्पट पेक्षा जास्त राखण्यात यश मिळवले आहे. बँकेने सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने योग्य पावले उचलली असून याबाबत देखील रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे.

बँकेचे भागधारक पॅनलप्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन. विनोद कुलकर्णी यांनी बँकेच्या ग्राहकांना ए.टी.एम. सुविधा उपलब्ध करून दिली असून ग्राहकांच्या मागणीनुसार मोबाईल बँकींग सुविधा, आय. एम. पी. एस सुविधा व क्युआर कोड यासंदर्भातील मान्यता मिळण्याची प्रक्रिया RBI कार्यालयात अंतिम टप्प्यात असून येत्या काही कालावधीतच या आधुनिक सेवा ही ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.  बँक आर्थिकदृष्टया सक्षम व भक्कम पायावर उभी असून बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक सुचनांनुसार, पारदर्शकपणे सुरू असल्याचे सांगितले.

बँकेचे जेष्ठ संचालक व माजी चेअरमन जयवंतदादा भोसले यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार बँकेचे आणखी एक ए.टी.एम. सेंटर बँकेच्या स्वमालकीच्या पोवईनाका शाखेत नजीकच्या काळात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नमुद करून ग्राहकांनी बँकेच्या विविध अल्प व्याजदराच्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक आनंदराव कणसे,  चंद्रशेखर घोडके (सराफ) , विजय बडेकर, वजीर नदाफ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य विनय नागर, सेवक संचालक हमीद शेख,  युवराज काळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, बँकेचे इतर अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.