वाई/  प्रतिनिधी यमुनेकाठी शहाजानने ताजमहाल बांधला. यमुनाबाई वाईकर यांची सावली होऊन कल्पना जावलीकर यांनी लोककला या ताजमहालाचे सौंदर्य जपले, कलापरंपरा जतन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कल्पना जावलीकर यांना राज्य कला संचलनालयाने लावणी,संगीत बारी क्षेत्रातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार व ३ लाख रुपये, सन्मान चिन्ह देऊन गौरविल्याबद्दल येथील आझाद बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर अध्यक्षस्थानी होते. श्री. कुलकर्णी म्हणाले, वाई परिसर लोककलावंतांची खाण आहे. कलावंत स्वतः दुःखात राहून, इतरांना आनंद देणारे असतात. माणसांसाठीच गाणे असते, हे जाणून जावलीकर यांनी मानवतेची सेवा केली. त्यांच्या कलेची शासनाने दखल घेऊन कदर केली. श्री. मर्ढेकर यांनी लोककलांच्या जतन आणि संवर्धनात शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन; त्यामध्ये जावलीकर परिवाराने योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे, बाबा शेख, भद्रेश भाटे, विश्वास पवार, रियाज काझी, संगीता कांबळे, सनी शेख, सुनिता शिंदे, नंदा सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.महंमद शेख यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत जावलीकर, जयवंत जावलीकर यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन, मोअज्जम इनामदार यांनी आभार मानले.     तुमच्या बातम्या, प्रतिक्रिया, मत व्यक्त करण्यासाठी उजव्या हाताकडील व्हॉटसअप बटनवर क्लिक करा