वाई / प्रतिनिधी खेळामुळे  विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ,सांघिक भावना निर्माण होते त्याला स्वछतेची जोड मिळाल्यास  जीवन समृद्ध होईल असे प्रतिपादन महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय विभूते यांनी केले. भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटी आणि मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत भिलार ग्रामपंचायत  यांच्या संयुक्त विधमाने हा वार्षिक क्रिडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी विभूते बोलत होते. यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे,   भिलार चे सरपंच शिवाजी भिलारे, जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक राजेंद्र भिलारे,किसन भिलारे,  गणपत पार्टे,प्रदीप कात्रट,टिपू  फिट्झहर्बर्ट ,राजेंद्र चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन भिलारे म्हणाले खेळ म्हणजे केवळ विजय किंवा पराभव नव्हे, तर खेळातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, चिकाटी आणि आत्मविश्वास निर्माण होतो. हिलरेंज हायस्कूल, हिलरेंज माध्यमिक विद्यालय आणि कै. एम आर भिलारे हायस्कूल राजपुरी या शाळांच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, अँरोबिक्स,पिरॅमिड,कवायत  यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.क्रीडास्पर्धेत यशस्वी खेळाडूंना गौरविण्यात आले.   प्रास्ताविकात डॉ तेजस्विनी भिलारे यांनी तीनही शाळांच्या शैक्षणिक आणि क्रीडा कार्याचा आढावा घेतला. स्वागत हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव जतीन भिलारे यांनी केले .सूत्रसंचालन वैशाली भिलारे आणि अथर्व गायकर,आदित्य मोडक, अनुष्का काळे या विद्यार्थ्यांनी केले.आभार हिलरेंज माध्यमिकचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांनी मानले.  यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक  उपस्थित होते     तुमच्या बातम्या, प्रतिक्रिया, मत व्यक्त करण्यासाठी उजव्या हाताकडील व्हॉटसअप बटनवर क्लिक करा