जो जिता वही सिकंदर!
जो जिता वही सिकंदर!
सातारा शहरात दहा सहकारी बँका होत्या. त्यापैकी ९ बँकांचे अस्तित्व संपुष्टात आले होते. हे अस्तित्व संपुष्टात येताना ज्या काही चुका तेथील व्यवस्थापनाकडून किंवा अधिकारी व कर्मचाºयांकडून घडल्या होत्या त्या सर्व चुका टाळून एक नवी व्यवस्था उभी केल्याने साताºयातील जनता सहकारी बँकेचे अस्तित्व टिकवून ती भक्कम ठेवण्यात मला व माझ्या सहकाºर्यांना यश मिळाले होते. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे प्रभावी काम करायचे हे एकमेव धोरण ठेवून मी योजना आखल्या. या योजना भान ठेवून आखल्या आणि बेभान होवून राबवल्या. ज्यावेळी नियमावर बोट ठेवून आपण काम करतो, त्यावेळी अनेक घटक दुखावले जातात. सगळे गुढी गुढी वातावरण करुन आर्थिक संस्था चालवता येत नाहीत. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा व लोकसभा अशा संस्थांमध्ये निधी आपोआप मिळतो आणि तो फक्त वाटायचा असतो. त्यामुळे अशा संस्थांमध्ये काम करणे अतिशय सोपे जाते. मात्र सहकारी संस्थांमध्ये अशाप्रकारे काम करता येत नाही. लोकांनी अतिशय विश्वासाने ठेवलेले पैसे विश्वस्त या भावनेने लोकांनाच वाटायचे असतात आणि पुन्हा त्याची शिस्तबध्द पध्दतीने वसुली करायची असते. कर्ज वाटप करताना, वसुली करताना अनेक लोक दुखावलेले असतात. कर्मचारी वर्गालाही रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे तंतोतंत पालन करायला सांगितल्याने तेही दुखावले जातात. कर्मचाºयांनाही आपले हक्क कळतात पण कर्तव्ये कळत नाहीत. त्यांना कर्तव्ये सांगितली की ते आपोआप विरोधात जातात. त्यातच मी बेधडकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. वेगवेगळ््या निवडणुकांच्या राजकारणामध्ये मनाला पटेल अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे अनेक जण दुखावलेले आहेत. त्याशिवाय अनेकांना जनता सहकारी बँकेत संचालक व्हायचे असते आणि त्यांना ती संधी मिळत नाही. त्यामुळे ज्यांना संचालक होता येत नाही, असे विरोधकही मोठ्या प्रमाणावर असतात. काही छुप्या पध्दतीने विरोध करतात आणि काही जण थेट विरोध करतात. त्यातच अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे येवून सातारा शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावर वेळोवेळी माझा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे माझ्याविषयी प्रचंड असुया अनेकांच्या मनात निर्माण झालेली आहे. हे सगळे सांगण्याचे कारण की ती असुया बाहेर काढण्यासाठी जनता सहकारी बँकेची निवडणूक हे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. लढाई फार मोठी नव्हती. मात्र तिला फार मोठे स्वरुप प्राप्त झाले होते. ही लढाई मी जिंकली आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात तिचे महत्त्व वेगळे आहे.
यंदाच्या जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीची वाट माझे अनेक शत्रू बघत होते. कधी एकदा बँकेची निवडणूक लागते आणि कधी एकदा विनोद कुलकर्णी यांची कोंडी करतो, असे अनेकांना झाले होते. मात्र माझ्या राजकारणाची स्टाईलच जरा वेगळी आहे. जनता सहकारी बँकेच्या सलग चार निवडणूका मी लढवलेल्या आहेत. त्यापैकी पहिल्या निवडणुकीत मी बिनविरोध निवडून आलो होतो. दुसºया निवडणुकीत अतिशय अल्प मताने माझा पराभव झाला होता. मात्र माझे पॅनेल निवडून आले होते. पराभूत होवूनही बँकेत संचालक होणारा आणि पराभूत झाल्यानंतरही चेअरमन होणारा मी कदाचित देशातील सहकार आणि बॅकींग क्षेत्रातील एकमेव उदाहरण ठरलो आहे. त्यावेळीही मोठी लढाई झाली. अगदी खालच्या पातळीपासून न्यायालयापर्यंत. सर्व लढाया मी जिंकल्या आहेत. २0१६ मध्ये तिसरी निवडणूक झाली आणि त्यामध्ये मी आणि माझे संपूर्ण पॅनेल निवडून आले होते. जनता बँकेच्या इतिहासात २१-0 असा निकाल पहिल्यांदा लागला होता. कारण त्यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत किमान २ आणि कमाल ३ विरोधक नेहमीच निवडून आलेले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी २0१६ मध्ये डावपेच लढवले होते आणि ते सगळे डावपेच यशस्वी झाले होते. यंदाची माझ्या नेतृत्वाखालीच मी चौथी निवडणूक लढवली. माझ्या सगळ््या विरोधकांचे डावपेच संपतात किंवा त्यांचे डोके चालायचे बंद होते, तिथून पुढे माझे डोके मी चालवतो. त्यामुळे अनेक लढायांमध्ये विजय माझाच झालेला आहे. जनता बँकेच्या यापूर्वी झालेल्या तीन निवडणुकांपैकी २ निवडणुकांमध्ये मी टार्गेट होतो. या निवडणुकीत तर फक्त मीच टार्गेट होतो. चारही बाजुने मला घेरले जाणार याची मला खात्री होती. त्यामुळे निवडणुकीत संपूर्ण विरोधी पॅनेल उभे राहणार नाही यासाठी मी पहिल्या दिवसापासून डावपेच लढवले. त्यात मला यश आले. अवघे ८ उमेदवारी अर्ज आमच्या पॅनेलच्या विरोधात आले. त्यापैकी ६ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. जनता बँकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात कधीच अपुरे विरोधी पॅनेल उभे राहिले नाही. नेहमीच १५ उमेदवारांसमोर १५ किंवा १८ समोर १८ आणि २१ असले तर २१ उमेदवार अशीच लढत झालेली आहे. यंदा ही पहिली निवडणूक अशी होती की जी २१ पैकी ४ उमेदवार बिनविरोध झाले आणि १७ उमेदवारांच्या विरोधात २ उमेदवार विरोधात उभे राहिले. शक्ती आणि ताकद दाखवून कोणीही मला वाकवायचा प्रयत्न केला तर मी कधीही वाकत नाही. प्रेमाने आणि विनम्रतेने मी कोणापुढेही वाकायला तयार असतो. मात्र धाक, ताकद आणि शक्तीपुढे मी कधीही झुकत नाही. विरोधी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी नेमके तेच केले. माझ्या विरोधात सर्व डावपेच त्यांनी लढवले. मी बधलो नाही आणि बँकेची निवडणूक लागली. जवळपास सेवानिवृत्त्त झालेले १00 कर्मचारी आणि माझे सगळे विरोधक एकत्र होवून माझ्या विरोधात लढले. विनोद कुलकर्णीला गाळा आणि अमूक उमेदवाराला मत द्या, असा जबरदस्त प्रचार जवळपास २00 हून अधिक लोक साताºयात आणि जिल्ह्यात करत होते. मला पाडायचे अशा निग्रहाने माझ्या विरोधात काम सुरु होते. विरोधक अतिशय जोमाने माझ्या विरोधातील प्रचारमोहिम राबवत होते. त्याचवेळी माझे सगळे सहकारी आणि उमेदवार माझ्यासाठी अतिशय निष्ठने आणि तळमळीने पॅनेलचे काम करत होते. त्यामुळे मला निवडणूक निकालाची कोणतीही चिंता नव्हती. यंदाची निवडणूक माझ्या एकट्याच्या नेतृत्वाखाली लढवली जात होती. माझे ज्येष्ठ सहकारी अँड मुकुंद सारडा हे या निवडणुकीत नव्हते. त्यांचे निधन झाल्याने सगळी लढाईची सूत्रे माझ्या एकट्याच्याच हातात होती. अॅड. सारडा यांची उणीव मला प्रकर्षाने जाणवत होती. २0१६ च्या निवडणुकीत माझी पत्नी ज्योतीने प्रत्यक्ष 80 टक्के मतदारांची थेट भेट घेवून प्रचार केला होता. मी नेहमीच पॅनेलचे नियोजन करणे आणि पॅनेलला मतदानाची यंत्रणा उभी करणे, पॅनेलसाठी मते गोळा करण्याचे काम करतो. कारण हे काम अतिशय महत्त्वाचे असते. पॅनेलची बांधणी झाली की संपूर्ण पॅनेलचा विजय निश्चित होत असतो. थेट मतदारापर्र्यत पोहचणे हे एकाचवेळी कठीण काम असते. यंदाच्या निवडणुकीत मी फक्त पॅनेल बांधणी केली. काही मतदारापर्यंत मी पोहचलो. मात्र सर्व मतदारांशी संपर्क करणे मला शक्य झाले नाही. मेसेज आणि पत्रकाद्वारेच मी मोठा प्रचार केला. २0१६ च्या निवडणुकीत ज्यांनी माझ्यासाठी टोकाची भूमिका घेवून माझा प्रचार केला होता, अशा काही लोकांनाही मी प्रचार करावा, असा आग्रह केला नाही. माझ्या पत्नीने करंजे भागात काही मतदारांच्या थेट भेटी घेतल्या आणि तिने आणि माझ्या मुलीने काही मतदारांशी फोनवरुन संपर्क साधला. २0१६ प्रमाणे अतिशय टोकाने प्रचार माझ्याकडून झाला नव्हता. माझ्या मनात निवडणुकीच्या काळात सतत एकच विचार येत होता की आपण जनता सहकारी बँक टिकवण्यासाठी काम केले आहे. वैयक्तीक वाईटपणा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांशी घेतला आहे. बँक वाचवण्यासाठीच आपण कठोर वागलो आणि त्यातून अनेक लोक आपल्या विरोधात गेले आहेत. मजबूत पॅनेलच्या बांधणीमुळे विजय निश्चित आहे. फक्त आपला विजय किती कमी अथवा जास्त फरकाने होतो, हे मला बघायचे होते. तुमचे विरोधक कितीही संख्येने जास्त असूदेत तुमचे चांगले काम नेहमीच त्याला उत्तर असते. हे उत्तर या निवडणुकीतून मिळाले आहे. तब्बल २ हजारहून अधिक मताच्या फरकाने माझा आणि माझ्या पॅनेलचा विजय झाला. ६0 वर्षाच्या बँकेच्या इतिहासात तब्बल दोनवेळा २१-0 असा ऐतिहासिक निकाल घेण्याचा मान मला व माझ्या पॅनेलला मिळाला आहे. विरोधकांची भक्कम एकजूट भेदून मी विजय मिळवला होता. शेवटी विरोधकांनी या विजयाचे कसेही विश्लेषण केले तरी जो जिता वही सिंकदर असतो. कारण विजयाचे फार विश्लेषण होत नाही. नेहमीच पराभवाचे विश्लेषण करावे लागते. विरोधकांचा चक्रव्यूह भेदून मी विजयी झालो. ज्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थाने केली आणि डावपेच लढवले, त्या सर्वांचा हिशोब लोकशाही मार्गाने होईल. माझी निवडणूक झाली आहे. ज्यांची राहिली आहे त्यांनाही मी कसा निर्णायक विरोध करतो हे समजेल. निवडणुकीनंतरही तातडीने काही प्रमुख विरोधी मंडळींशी चर्चा होवून माझा समजोता झाला आहे. शेवटी मी यशवंराव चव्हाण यांच्या विचारांनी काम करनारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आवश्यक असेल तेथे मी बेरीज केली आहे. मात्र ज्यांच्याशी तडजोड केली तरी वजाबाकीच होईल अशा लोकांशी बेरीज करण्याचा माझा कोणताही विचार नाही. जे सोबत राहिले त्यांच्या प्रेमाच्या ऋणातून मी कधीच उत्तराई होवू शकत नाही. सोबत राहणाºयांच्या सोबत आणि पाठीशी मी नेहमीच असणार आहे आणि ज्यांनी विरोध केला त्यांचा हिशोब निश्चित होईल. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, सभासद आणि हितचिंतक, नेते या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. त्यांच्या पाठींब्या आणि प्रेमामुळेच मी विजयी होवू शकलो याची मला नेहमीच जाणीव राहिल.
आपला स्नेहांकित
विनोद कुलकर्णी
-प्रमुख
भागधारक पॅनेल,
जनता सहकारी बँक लि; सातारा.