सरत्या वर्षाने काय दिले? छप्पर फाड़के दिग्विजयी यश
सरत्या वर्षाने काय दिले यापेक्षा काय दिले नाही हे विचारा?
२०२३ हे वर्ष सुरू झाले, त्यावेळी समोर आव्हानांचा डोंगर उभा होता. काय करु आणि काय नको इतके प्रश्न पड़ले होते. कशात यश येनार आणि कशात अपयश येनार हे कळायचे नाव घेत नव्हते. प्रत्येक जन आव्हानांचा फ़ायदा घेन्याचा प्रयत्न करत होता. तड़जोड़ करुन यश मिळवायचे की लढ़ून निर्भेळ यश मिळवायचे असे द्वंद मनात सुरू होते. मात्र कोणतीही तडजोड मनाविरुद्ध करुन एकवेळ खोटी सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळवन्यात काय अर्थ आहे, असा विचार मनात आला आणि कोणतीही तड़जोड न करता पुढ़िल सगळे निर्णय घेतले. प्रयत्नांती परमेश्वर असे बोलले जाते. त्याचा प्रत्यय मला यावर्षात आला. प्रचंड असुयेचा विरोध आणि तीव्र विरोधक असतानाही फक्त कामाच्या आणि चांगल्या मित्रांच्या पाठबळावर जनता बॅंकेत २१~० असा निर्विवाद विजय मिळवला. सभासदांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पड़ता भरभरुन मतदान केले. त्यानंतर सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन निवडनूक झाली. त्या निवडनुकित गेल्यावेळी मी अवघ्या एक मताने पड़लो होतो आणि माझे अर्धे पॅनेल पड़ले होते. बहूमतही आम्ही गमावले होते. मात्र विरोधक फ़ोडून पुनःहा सत्ता मिळवली होती. पन फोड़ाफोड़ीच्या राजकारनात मजा आली पन काम करता आले नव्हते. यंदा ज़ोर लावला आणि एकतर्फ़ी दनदनीत असा १९~० विजय मिळाला. मीही सर्वाधिक दुसर्र्या क्रमांकाची मते मिळवून विजयी झालो. माझे दोन मित्र दोन्ही संस्थांमध्ये चेअरमन झाले, हा एक दुग्धशर्करा योग जुळून आला. पदाचा मोह नाकारुन मित्रांना पदावर बसवन्याचा आनंद काही ओरच असतो, तो खूप समाधान देनारा असतो. हे झाले निवडनूकीचे निकाल. त्याशिवाय चार ग्रेट व्यक्तिमत्त्वाच्या मुलाख़ती घेता आल्या. प्रसिद्ध कवी वैभव जोशी, अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर, गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेड़े यांची मुलाख़त घेतली. मिशीवाले प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची मुलाख़त आणि अमृतमहोत्सवी सत्कार करन्याचा योग आला. नवकवितेचे जनक बा. सी. मर्ढेकर यांचे नामशेष होन्याच्या मार्गावरिल घर पुन्हा उभे केले. विशेष बाब अशी की हे घर कायमस्वरुपी मसाप शाहूपूरी शाखेला देखभाल दुरुस्तीसाठी बा. सी. यांचे चिरंजीव राघव यांनी दिले, एवढी विश्वासहर्ता आमच्या कामाने निर्माण झाली आणि केवढ़े भाग्य वाट्याला आले. ग़रीब विद्यार्थ्यांसाठी मोफ़त अभ्यासिका सुरू झाली, हे एक समाजपयोगी काम झाले. ही सगळी ठळक वैशिष्ट्ये आहेत. एकाही गोष्टित अपयश नाही. सगळे यशच या वर्षाने दिले. आणखी एक दि गुजराथी अर्बन सोसायटी या संस्थेचा शतक महोत्सवी सोहळा दिमाखदारपने साजरा करता आला. एका वर्षाने किती द्यावे आणि काय काय साध्य करावे. हे सगळे जनतेने, मित्रांनी आणि समर्थकांनी केलेल्या सहकार्यामूळे आणि नेतेमंडळींनी दिलेल्या आशीर्वादामूळे शक्य झाले हेही आवर्जुन सांगावेसे वाटते. तुमच्या प्रेमातून उत्तराई होणे शक्य नाही. तुमचा सगळ्यांचा विश्वास कायम सार्थ ठरवेन हा माझा शब्द आहे.
जाता जाता तळटिप
जनता बॅंकेत ज्या उमेदवाराने माझ्या विरोधात निवडनूक लढ़वली, त्याच उमेदवाराने अवघ्या तीन महीन्यात फ़ेडरेशन निवडनुकित मला मतदान केले. प्रचारात सहभाग घेतला आणि विजयी मिरवनुकीत भाग घेऊन आनंद द्विगुणित केला. कदाचीत यालाच बेरजेचे राजकारन बोलत असतील.
आपलाच
विनोद कुलकर्णी