Vinod kulkarni
⟵ Back to Home

Vinod kulkarni

सहकार क्षेत्रातील कणखर नेतृत्व
सहकार क्षेत्रातील कणखर नेतृत्व

सहकार क्षेत्रातील कणखर नेतृत्व

पत्रकारितेमध्ये काम करत असताना सातारा शहरातील सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे कामकाज त्यांनी अनुभवले. त्यामुळे ते सहकार क्षेत्राकडे आकर्षित झाले. सहकार क्षेत्रातील विविध कायद्याचा, कामकाजाचा माहिती त्यांनी प्रचंड मेहनत, अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर घेतली. तोटयात असलेल्या संस्था फायद्यात आणून त्यांना प्रगतीपथावर नेले. विविध संस्थाचे संचालक, अधिकारी, कर्मचा-यांना बरोबर घेऊन या क्षेत्रात साता-याचे नाव अग्रेसर कसे राहिल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज त्यांच्याकडे सहकार क्षेत्रातील कणखर नेतृत्व म्हणून बघितले जाते. गुजराथी अर्बनमधून सुरुवात सातारा शहरातील जुनी पतपेढी असलेल्या दि गुजराथी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीमध्ये 2005 मध्ये त्यांची स्वीकृत संचालक म्हणून निवड झाली. स्वीकृत संचालक म्हणून काम करत असताना संस्था तोटयात असल्याचे लक्षात आले. त्यावर्षी झालेल्या निवडणुकीत तत्कालीन चेअरमन रामचंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल टाकून एकहाती निवडणूक जिंकली आणि सहकार क्षेत्राच्या पटलावर विनोद कुलकर्णी यांचा उदय झाला. तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचा तोटा असलेल्या संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा त्यांनी स्वीकारली. ही धुरा त्यांनी नुसतीच स्वीकारली नाही तर तोटयात असलेल्या संस्थेला फायद्यात आणून आपल्या कामाची चुणूक दाखवली. तेव्हापासून एक वर्षाचा अपवाद वगळता ते गुजराथीचे आजअखेर चेअरमन आहे. संस्थेच्या 5 कोटी ठेवी वरुन 22 कोटी ठेवीपर्यंत प्रगती केली. एक शाखा होत्या त्याच्या आज तीन शाखा झाल्या आहेत. संगणकीकृत कामकाज, कोअर बँकिंग, ए.टी.एम. कार्ड, मोबाईल बँकिंग अशा आधुनिक सुविधा देणारी पतसंस्था म्हणून गुजराथीचा आज नावलौकिक आहे. साता-यातील जनता सहकारी बँकेचा नावलौकिक वाढवणारे नेतृत्व गुजराथी अर्बनमध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामाची दखल घेऊन 2006 मध्ये जनता सहकारी बँकेत त्यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली. बँकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात बिनविरोध संचालक म्हणून निवड होणारे ते एकमेव संचालक आहेत. 2008 मध्ये त्यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. तत्कालीन संचालक मंडळाचे धोरण न पटल्याने त्यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अॅड. मुकुंद सारडा यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये नवीन पॅनेलची उभारणी केले. स्वतः पराभूत झाले पण 15-3 अशा फरकाने बँकेत सत्ता मिळाली. त्यानंतर तज्ञ संचालक म्हणून निवड झाली. जनता बँक अडचणीत होती. परंतु बँक अडचणीतून काढण्याची त्यांची जिद्द होती त्यांना संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले त्यामुळे 2011 ते 2016 या कालावधीत बँकेचा साडेचार कोटीचा तोटा भरुन काढला. पराभूत झाल्यावर रिक्त जागेवर त्यांची संचालक म्हणून निवड करुन एकमताने ते बँकेचे चेअरमन झाले. या कालावधीत त्यांनी बँकेच्या विविध बाबींवर काम केले. तब्बल 12 वर्षानंतर सभासदांना डिव्हीडंड देण्यात आला. 2016 मध्ये पु्न्हा अॅड. मुकुंद सारडा यांच्याबरोबर निवडणुकीला सामोरे गेले आणि बँकेच्या इतिहासात 21-0 असा दैदिप्यमान विजय मिळवला. आता बँकेचा विस्तार करण्यासाठी ते सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील आहेत. पतसंस्था फेडरेशन गुजरार्थी अर्बन, जनता बँकेबरोबरच पतसंस्था फेडरेशनमध्येही त्यांनी उत्कृष्ट काम केले. 2008 मध्ये त्यांची सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनमध्ये स्वीकृत संचालक म्हणून निवड झाली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी फेडरेशनमध्ये स्वतः पॅनेल टाकून संपूर्ण निवडणूक बिनविरोध केली. 2011 ते 2016 पाच वर्षे चेअरमन म्हणून उल्लेखनीय काम केले. सध्या ते स्वीकृत संचालक म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्हा पतसंस्थेची वसुली गतिमान होण्यासाठी प्रयत्न केले. ऑनलाईन कार्यालये केली. सातत्याने प्रशिक्षण, अधिवेशने घेऊन पतसंस्थांचे प्रश्न सोडवले. 100/85, पतसंस्था ठेवींना विमा संरक्षण यावर काम केले. उच्च न्यायालयात जाऊन विविध प्रश्नांवर याचिका दाखल करुन ते सोडवले. जिल्हयातील पतसंस्थांना आदर्श पतसंस्था पुरस्कार सुरु केला. स्थैर्य निधीची उभारणी केली. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनमध्ये 2011 साली स्वीकृत संचालक म्हणून निवड झाली. 2015 मध्ये त्यांनी बिनविरोध विजय मिळवला. राज्यस्तरावर पतसंस्थांचे प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ मिळवून दिले. जिल्हा, राज्य, सहकार आयुक्त, सचिव, मंत्री यांच्यापुढे ते मांडून सोडवले.

🟢 WhatsApp